निसर्गरम्य अक्षी आणि प्राचीन शिलालेख
|| महाराष्ट्र देशा || निसर्गरम्य अक्षी आणि प्राचीन शिलालेख पंकज समेळ 3 वर्षे पूर्वी जाहिराती Ad अक्षी. अलिबाग-चौल मार्गावर वसलेले छोटसे गांव. अक्षी गांव ओळखण्याची खुण म्हणजे रस्ता दुभाजकाचे काम करणारा स्तंभ. ह्या स्तंभापासून साधारणपणे १.५ किमी वर आहे अक्षीचा समुद्रकिनारा. समुद्रकिनाऱ्यापर्यंत थेट गाडी जात असली तरी अक्षी गावात पायी फेरी मारण्याची वेगळीच मजा आहे. पर्यटकांसाठी अक्षी मध्ये आहे नारळी-पोफळीच्या बागा, किनाऱ्यावरील पांढरी वाळू व सुरुच्या बागा, सुंदर समुद्र आणि दूरवर दिसणारा कुलाबा किल्ला. त्याचबरोबर इतिहास अभ्यासक व संशोधक यांच्यासाठी अक्षी गावात आहे ग्रामदैवत सोमेश्वर महादेव व कालिकादेवी (श्री काळंबा देवी मंदिर / कालकाबोरवा) यांची मंदिरे आणि दोन गध्देगाळ. एका गध्देगाळीवर शिलाहारवंशातील राजाचा, तर दुसरीवर यादववंशातील राजाचा लेख आहे. मुख्य रस्त्यावरून आक्षी गावात प्रवेश केल्यानंतर सुरुवातीलाच उजव्या हाताला सोमेश्वर महादेव मंदिर आहे. कोकणातील इतर मंदिरांप्रमाणेच हे मंदिरसुध्दा कौलारू आहे. मंदिराचा सभागृह प्रशस्त असून प्रवेशद्वाराजवळ नंदीची मूर्ती आहे. तसेच सभामंडपातील लाकड...
Comments
Post a Comment