माझा आवडता प्राणी: "गाढव"
माझा आवडता प्राणी: "गाढव" हरिप्रसाद in जनातलं, मनातलं 15 Oct 2007 - 2:28 pm तसे मला सगळेच प्राणी आवडतात पण लांबुनच बघायला ते ठिक वाटतात. पण या सर्व प्राण्यांमध्ये "गाढव " हा माझा सर्वात आवडता प्राणी आहे. गाढवाला २ डोळे, २ कान, ४ पाय व १ शेपूट असते. त्याच्या अंगावर काहि वेळा पट्टे मारलेले दिसतात. त्यावेळी ते मला झेब्र्यासारखे वाटते. 👉 आपण रस्ता नेहमी झेब्रा क्रोसिंग वरुनच क्रोस करवा. झेब्रा हा प्राणी प्रामुख्याने जंगलात आढळतो. पण आजकाल मुळी जंगलच आढळत नाही. त्यामुळे झेब्रा कुठे असतो ते मला माहित नाही. कमल हसन च्या "हिदुस्थानी" नावाच्या सिनेमामध्ये खुप सरे झेब्रे दाखवले होते त्यामुळे सिनेमावाले झेब्रे पाळत असल्याची मला शक्यता वाटते.पण सलमान खान नावाचा नट हरणांच्या शिकारीबरोबरच झेब्र्याची सुध्धा शिकार करत असल्याची शक्यता असल्याने सध्या सिनेमात झेब्रे दाखवत नाहित. मला "किंगकॉग" नावाचा अस्वलाचा सिनेमा आवडतो. ईसापनितीमध्ये गाढवाच्या खुप गोष्टी आहेत. माझी आज्जी मला रोज झोपताना गोष्टी सांगते. पण👉 ईसापनितीमध्ये गाढवाला नेहमीच बावळट म्हणुन दाखविल...